ॲड.गुरुनाथ कुळकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगावच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना

अध्यक्ष पदी प्रविण धामापुरकर यांची निवड

चौके (प्रतिनिधी) : ॲड.गुरुनाथ कुळकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगावच्या माजी विद्यार्थी संघाची गुरुवार १२ मार्च
रोजी स्थापना करण्यात आली. संस्था उपाध्यक्ष अरुण भोगले, सेक्रेटरी हेमंत हडकर,खजिनदार महादेव सुर्वे यांच्या तसेच माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरचं शाळेच्या भौतिक, शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा हातभार लागवा यासाठी शासनाच्या मागणी, आदेशावरून माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्रित करून प्रशालेचा सर्वांगीण विकास साध्य करावा यासाठी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.

यावेळी उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांमधून
अध्यक्षपदी प्रविण अभिमन्यू धामापुरकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सचिन अंकुश
तोंडवळकर, सचिव पदी मुख्याध्यापक बेनके सर, कोशाध्यक्ष पदी दिनेश दिपक भोगले तर सदस्य पदी अमोल गोसावी, रत्नू सुर्वे, गोविंद भोगले, प्रदिप सावंत, सुधीर पडेलकर, साईश खोत, कृष्णा वंजारे यांची निवड करण्यात आली, तर सल्लागार सदस्य म्हणून मुख्याध्यापक आर. के. बेनके, पालक प्रतिनिधी नारायण पोयरेकर, सेवानिवृत्त अधिकारी महादेव सुर्वे, आणि सेवानिवृत्त शिक्षक उदय जोशी यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.

प्रशालेतून शिकून गेलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना संघटित करून शाळेच्या भौतिक, शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेल अशी ग्वाही अध्यक्ष प्रविण धामापुरकर यांनी यावेळी बोलताना दिली.

error: Content is protected !!