बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या वतीने खास महिलांसाठी आयोजित केलेल्या स्वयंसिध्दा मी या कार्यक्रमास सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बांदा येथील श्री विठ्ठल मंदिर नजीक असलेल्या व्यापारी भुवन, बांदा सभागृहात शनिवार व रविवार असे दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात शॉपिंग स्टॉल्स, फुड स्टॉल्स, महिलांसाठी विविध स्पर्धांसह,सायबर जनजागृती मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शनिवारी सकाळी महिला उद्योजिका आनंदी शिरोडकर यांच्या हस्ते शॉपिंग फेस्टिव्हलचे उदघाटन झाले.या वेळी प्रमुख अतिथी भाजप महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य श्वेता कोरगांवकर या उपस्थित होत्या.उद्योगशील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी 17 शॉपिंग स्टॉल्स लावण्यात आले होते. उदघाटनानंतर मान्यवरांसह मंडळ अध्यक्ष अंकिता स्वार,वंदना पावसकर, रिया वाळके,रूपाली शिरसाट, स्नेहा पावसकर,सिंधिया पावसकर,प्रिया नाटेकर, तन्वी काणेकर,सपना विरनोडकर,सायली वीरनोडकर,श्रिया गोवेकर,श्रृती गोवेकर,श्रृती वळंजु,श्रृती शिरोडकर, सावली कामत,सोनाली राणे ,पल्लवी पावसकर, उज्वला महाजन,अमिता स्वार, माधुरी पावसकर,मृणाल तोरसकर, निनता गोवेकर,साधना पांगम, सिद्धी पावसकर आदी क्रिएटीव्ह सखी सदस्यांनी सर्व स्टॉल्सना भेट दिली.यावेळी मंडळातर्फे आनंदी शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पिता गाड यांनी सर्वांना युपीआय चा वापर तसेच ऑनलाईन फ्रॉडबाबत जनजागृती करणारी माहिती दिली.
सायंकाळी फुड फेस्टिवलच्या 16 स्टॉल्स चे उदघाटन गावातील आशा सेविकांच्या हस्ते बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. होणार आहे.यावेळी आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिया वाळके,मान्यवरांचे स्वागत वंदना पावसकर, सुत्रसंचालन रुपाली शिरसाट तर आभारप्रदर्शन स्नेहा पावसकर यांनी केले.
शनिवारी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगला. गौतमी गोवेकर पैठणीच्या मानकरी ठरल्या. रविवारी सायंकाळी महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा अंकीता स्वार यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सचला आरोलकर-पाटील, द्वितीय सपना विरनोडकर,तृतीय स्नेहा पावसकर तर उत्तेजनार्थ परितोषिक प्रणिता सावंत यांना मिळाले. स्पर्धा परीक्षण स्वाती पाटील आणि माधवी शहापूरकर यांनी केले.जि.प.सदस्य प्रमोद कामत व पं. स.सदस्य ऋतिका नाईक यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
क्रिएटीव्ह सखी ग्रुप च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.











