ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

इयत्ता तिसरीतील अलिशा इसप देशात 38 वी व समर्थ ठाकूर देशात 50 वा

खारेपाटण (प्रतिनिधि) : नुकत्याच घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल संपादन केले असून या परिक्षेत इयत्ता ३ री मधील विद्यार्थीनी अलीशा इसप ही संपूर्ण भारत देशात गुणवत्ता यादीत ३८ वी आली आहे. तर समर्थ ठाकूर हा विद्यार्थी देशात ५० वा आला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी होण्याच्या दृष्टीने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा ही अत्यंत उपयुक्त अशी परीक्षा आहे. या परीक्षेला खारेपाटण प्रशालेतील सुमारे ५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशालेचा निकाल हा १०० टक्के लागला असून इयत्ता तिसरीतील अलीशा इसप हिने सुवर्णपदकासह देशात ३८वा क्रमांक पटकावला व इयत्ता तिसरीतील कुमार समर्थ ठाकूर याने सुवर्णपदकासह देशात ५० वा क्रमांक पटकावला आहे. तर शाळेच्या एकूण ३१ विद्यार्थ्यांना रोप्यपदकं व कांस्यपदकं प्राप्त झाली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेमध्ये विशेष मार्गदर्शन केले जाते. याचाच परिणाम म्हणून हे उज्वल यश विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे अशी भावना प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी व्यक्त केली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षिका दर्पे, शर्मिन काझी, अदिती गुरव, पुनम गुरव यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व संचालक मंडळ, पालक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

अलिशा इसप देशात 38 वी

समर्थ ठाकूर देशात 50 वा

error: Content is protected !!