मुंबई गोवा हायवेवर वागदे येथे प्रेसो कारची रिक्षा टेम्पोला धडक

एक गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्यामुळे वागदे टेम्बवाडी येथे अपघात घडला. 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भंगार व्यावसायिक असलेला कुमार सूर्यवंशी हा आपल्या ताब्यातील रिक्षा टेम्पो घेऊन कणकवलीहून कसालच्या दिशेने जात होता. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो क्रमांक GA-03 Z-9608 या कारच्या चालकाने  वागदे टेम्बवाडी येथे भरधाव वेगात रिक्षा टेम्पोला मागून धडक दिली. कारची धडक एवढी मोठी होती की अपघातात रिक्षा टेम्पोची चालकासमोरील काच फुटून कुमार सूर्यवंशी हा काच फुटलेल्या जागेतून उडून रस्त्यावर पडला. या अपघातात कुमार सूर्यवंशी जखमी झाला असून त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेसो कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षा टेम्पो चेही नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

error: Content is protected !!