महिला मॅरेथॉन स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे निर्विवाद वर्चस्व

महिला दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेत मॅरेथॉन स्पर्धा

तळेरे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात तळेरे गावात प्रथमच मुलींना क्रीडा क्षेत्रात दर्जा देण्यासाठी व त्यांना प्रोहत्सान मिळावे य हेतूने श्री फोँडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी,निरोम व वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय,तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन,सिंधुदुर्गच्या मान्यतेने आयोजित जिल्हास्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धा-२०२६ आणि क्रीडाक्षेत्रातील “महिला क्रीडारत्न” सन्मान सोहळ्याचे आयोजन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय,तळेरे येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उदघाट्न शाळा स.सदस्य- शरद वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले.शाळा स.सदस्य निलेश सोरप,
तळेरे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, औदुंबरनगरच्या पोलीस पाटील श्रेयाजंगले, कणकवली क्रीडा समन्वयक तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयचे क्रीडा शिक्षक व पत्रकार दत्तात्रय मारकड, तळेरे विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर,संघटचे संस्थापक अध्यक्ष समीर राऊत, स्पर्धा आयोजन सचिव डॉ.प्रमोद घाडीगावकर,वरळी मुंबईचे फूटबॉल मार्गदर्शक मनीष भालेकर, तळेरे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक नवलसिंग तडवी, तळेरे प्रशालेच्या शिक्षिका तळेकर डी.सी,पी.एन.कानेकर,

ए.बी.कानकेकर,एस.एस.पडवळ, एस.सी.शेट्ये, ए.पी.कोकरे,एस. यु.सुर्वे,आर.आर.खटावकर,रोहिणी जाधव ,नुतन भावे,मिनल महाडिक, नम्रता गावठे,ए.एस.गोसावी, आर.जी.तांबे, के.डी.तळेकर, एस.आर.वानोळे,डी.यु.तळेकर, संदेश तळेकर,अंजली जयसिंग गायकवाड (महिला क्रीडा प्रमुख ), पालक प्रतिनिधी दीप्ती नारिंग्रेकर, प्राची दिनेश लाड, सुवर्णा जोशी (सचिव),स्वप्नाली बेनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
१२ वर्षाखालील मुली -२ की. मी. धावणे
1)हर्षिता तडवी,
2)रुंजी भोगले,
3)रिद्धी कल्याणकर,
(वामनराव महाडिक माध्यमिक शाळा तळेरे)
१४ वर्षाखालील मुली ३ की. मी धावणे :-
1)श्रावणी नारिग्रेकर (श्री फोँडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी )
2)दुर्वा घाडी (वामनराव महाडिक माध्यमिक शाळा तळेरे)
3)आरोही चव्हाण(वामनराव महाडिक माध्यमिक शाळा तळेरे),
4)मुग्धा राऊत (वामनराव महाडिक माध्यमिक शाळा तळेरे).
१७ वर्षखालील मुली ३ की. मी धावणे :-
1)वेदिका पवार (सेठ एन. एम. वि. खारेपाटण)
2)सिद्धी राऊत (सेठ एन. एम. वि. खारेपाटण)
3)कस्तुरी सावंत (वामनराव महाडिक माध्यमिक शाळा तळेरे),
महिला खुला गट ५की. मी धावणे. :-
1)रेश्मा पांढरे (श्री फोँडकण देवी स्पोर्ट्सअकॅडमी ),
2)ईशा शिरोडकर (श्री फोँडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी),
3)दर्शना कुडापकर (श्री फोँडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी )
४५ वर्षावरील महिला गट ५की. मी धावणे
1)आशा बाळकृष्ण कानकेकर (वामनराव महाडिक माध्यमिक शाळा तळेरे)
तसेच क्रीडारत्न सन्मानमूर्तीची नावे खालीलप्रमाणे
1),कु.सावी वैभव मुद्राळे (राष्ट्रीय वीर गाथा) कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे, वेदिका तेली (राज्य वीर गाथा)कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे ),श्रावणी नारिग्रकर (अथलेटिक्स राज्य ),रिद्धी कल्याणकर (राज्य रोपस्कीपिंग ),रुंजी भोगले (राज्य रोपस्कीपिंग),हर्षिता तडवी (राज्य रोपस्कीपिंग ,मुग्धा राऊत (राज्य रोपस्कीपिंग ),आशा कानकेकर (राज्य रोपस्कीपिंग ),दर्शना कुडापकर (राज्य अथलेटिक्स ),संध्या गोधोळकर (राष्ट्रीय तायक्वाडो ),शरयू अरुण पाटील (राष्ट्रीय तायक्वांदो ), रुचा चव्हाण (राष्ट्रीय तायक्वांदो ),अंजली गायकवाड (राज्य अथलेटिक्स ), प्राची दिनेश लाड (राज्य अथलेटिक्स ) आदी महिला रत्नांचा संस्थेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात करण्यात आले.
दरम्यान खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्राचार्य अविनाश मांजरेकर म्हणाले की,
नुकत्याच झालेल्या महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि महिलांबद्दल आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रशालेत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

मॅरेथॉन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहनशक्ती,शिस्त आणि खेळाविषयीची आवड वाढते. महिला दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.पुढील काळातही अशा क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील असे उद्गार कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी काढले.

बक्षीस वितरण कार्यक्रमात सूत्रसंचालन संयोजक समीर राऊत यांनी केले.

error: Content is protected !!