अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तिन्ही अधिपरीचारीकानी काम बंद चा दिला होता इशारा
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या सुचनेनंतर देवगड ग्रामीण रुग्णालयात तात्काळ अधिपरिचारिका नियुक्तीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले आहेत.जिल्हा रुग्णालयातील प्रियांका रामा गवस या कंत्राटी अधिपरिचारिका यांना 1 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत नियुक्ती देण्यात आली आहे.देवगड ग्रामीण रुग्णालयात 10 अधिपरीचारिका आवश्यक असताना केवळ 3 अधिपरीचारिका रुग्ण शुश्रूषा करत आहेत. कामाच्या अति ताणामुळे 3 ऑक्टोबर पासून सध्या कार्यरत असलेल्या तिन्ही अधिपरीचारीकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार नितेश राणे यांनी या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात स्टाफ नर्स नियुक्त करण्याची सूचना केली होती.












