आचरा रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवात आज ‘किमिच्छक व्रत’ दशावतार नाट्य प्रयोग..!

उद्योजक मनोज प्रकाश हडकर यांच्या सौजन्याने दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन

दशावतार प्रेमींसाठी रंगणार पारंपरिक कलाविष्काराची मेजवानी

श्री दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार सादर

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४१ दिवसांच्या गणेशोत्सवाची भक्तिमय आणि सांस्कृतिक रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आज संकष्टी चतुर्थी, मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री ठीक ९ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर, आचरा येथे भव्य ‘किमिच्छक व्रत’ या दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्योजक मनोज प्रकाश हडकर, चिंदर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेला हा दशावतार नाट्यप्रयोग श्री दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सादर केला जाणार आहे. कोकणच्या समृद्ध लोककलेचा अविभाज्य भाग असलेल्या दशावताराच्या माध्यमातून ‘किमिच्छक व्रत’ची कथा, अभिनय, संवाद, संगीत आणि पारंपरिक रंगत रसिकांना अनुभवता येणार आहे.

गणेशोत्सवाला लाभतेय पारंपरिक कलेची रंगत

आचरा रामेश्वर संस्थानच्या ४१ दिवसांच्या गणेशोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून कोकणच्या पारंपरिक दशावतार कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणाला सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष जोड मिळत आहे.

अंगारीका संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने होणाऱ्या या विशेष दशावतार नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्यासाठी भाविक, दशावतारप्रेमी आणि कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!