सिंधुदुर्ग कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरी-ओरोस, यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवाराचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ व योग्य भाव मिळण्यासाठी सुसज्ज मुख्य बाजार आवाराची आवश्यकता आहे. बाजार समितीच्‍या मुख्य बाजार आवारामुळे जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांच्‍या उत्‍पादित मालाला योग्‍य भाव आणि चांगले मार्केट उपलब्ध होणार आहे. बाजार समितीच्या आगामी वाटचालीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, प्रक्रियादार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. त्‍यामुळे व्यापारी, शेतकरी, अडते, प्रक्रियादार, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्य तसेच संबंधित सर्व मान्यवरांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस आवर्जून उपस्थित रहावे.

वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य यांनी संस्थेचा ठराव घेऊन उपस्थित राहावे, अशी पूर्वी नमूद केलेली अट शिथिल करण्यात येत असून, संबंधितांनी कोणताही ठराव न घेता सदर वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यानी केले आहे.

error: Content is protected !!