हळवल गावातील दुष्काळग्रस्त शेतीची पंचायत समितीच्या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सभापती हर्षदा वाळके पोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचल्या. पंचायत समिती कणकवलीच्या वतीने हळवल गावातील दुष्काळग्रस्त शेती पिकांची आज प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसानीची स्थिती जाणून घेण्यात आली.

पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या शितल दळवी तसेच पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, पवन भालेकर, लक्ष्मण गावडे, सहदेव खाडये, अक्षता राणे, संजना राणे आणि मानसी मराठे यांनी हळवल येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.

यावेळी हळवलच्या सरपंच अपर्णा चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका कृषी अधिकारी ओहोळ, पंचायत समिती कणकवलीचे कृषी अधिकारी शशिकांत भरसट आणि ग्रामपंचायत अधिकारी वर्षा कदम उपस्थित होते.

संतोष गुरव, दामोदर परब, नामदेव परब, अशोक गावडे, लक्ष्मण राणे, शशिकांत राणे, मारुती सावंत आणि लवू राणे या शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांवर झालेल्या परिणामांची माहिती घेण्यात आली.

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व नुकसानाची माहिती जाणून घेण्यात आली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शासनस्तरावर आवश्यक ती मदत व उपाययोजना करण्यासाठी पाहणी महत्त्वाची ठरणार आहे.

यावेळी हळवलच्या सरपंच अपर्णा चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका कृषी अधिकारी ओहोळ, पंचायत समिती कणकवलीचे कृषी अधिकारी शशिकांत भरसट आणि ग्रामपंचायत अधिकारी वर्षा कदम उपस्थित होते.

error: Content is protected !!