अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग यांच्या समन्वयातूनच महापोषण अभियानाचे उद्दिष्ट सफल होईल– सरपंच संजना आग्रे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अंगणवाडी फोंडा , बावीचेभाटले शाळेमध्ये नुकतेच महापोषण अभियान संपन्न झाले.सरपंच संजना आग्रे यांनी भेट देऊन पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि महापोषण अभियानाचे महत्त्व विशद केले.गरोदर माता, स्तनदा माता, आणि बालकांना संतुलित व पोषण युक्त आहाराचे महत्त्व पटवून द्यावे .बालकांमध्ये कुपोषण कमी करून आणि रक्तक्षयाचे प्रमाण कमी करून बालकांच्या नियमित वजन व उंची वाढीवर लक्ष ठेवावे.तसेच स्थानिक व हंगामी पौष्टिक पदार्थाच्या सेवनाला प्रोत्साहन द्यावे. स्वच्छता, आरोग्य, योग्य आहाराच्या सवयी बद्दल जनजागृती करावी. इत्यादी बाबी अंगणवाडी सेविका शिक्षक वर्ग यांनी मनापासून काम केल्यास आणि त्यास पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास, या महापोषण अभियानाचे शासनाचे उद्दिष्ट सफल होईल, आपल्या परिसरात कुणीही कुपोषित बालके राहणार नाहीत ? असा विश्वास वाटतो. प्रत्येक घटकांनी याची खबरदारी घ्यावी. असे त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप शेळके,सहाय्यक शिक्षक गव्हाणकर, रवींद्र पाटकर, सेविका विद्या म्हस्कर, माता-भगिनी आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते…

error: Content is protected !!