कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी घोणसरी च्या वतीने घोणसरी एसटी पिकअप शेड परिसरात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता ही सेवा या संकल्पनेला एक राष्ट्रीय कर्तव्य समजून भारतीय जनता पार्टी घोणसरी च्या कार्यकर्त्यांनी आज घोणसरी एस् टी पिकअप शेड परीसरात दोन तास साफसफाई करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले .यावेळी घोणसरी बुथ अध्यक्ष बाबुराव ( प्रकाश) राणे घोणसरी सरपंच मॅक्सी पिंटो मा.उपसरपंच विलास मराठे वि.का.स.सो.संचालक मकरंद पारकर जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक जाधव गुरुजी अनिल राणे सामा.कार्यकर्ते मिलिंद मराठे उपसरपंच रविन्द्र (लवु) सावंत अनंत गुरव रॉबर्ट रैस उमेश राऊत मा.पो.पा. चंद्रकांत जाधव आबा साळुंखे प्रविण बुकम प्रमोद राणे किरण पेडणेकर आदि कार्यकर्ते उस्फूर्त सहभागी झाले होते.
घोणसरी भाजपा कमिटी च्या वतीने एसटी पिकअप शेड परिसरात स्वच्छता मोहीम












