बिनधास्त या… मांडवली केलीय… धाड पडणार नाही ; जुगारवाल्यांकडून खेळीना हमी

कणकवलीत पुन्हा अंदरबाहर जुगार सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात पुन्हा अंदर बाहर जुगाराने जोम धरला असून दररोज जुगाराचे ठिकाण बदलून लाखोंची उलाढाल अवैध जुगारातून केली जात आहे. याबाबतचे तक्रारअर्ज कणकवली पोलीस निरीक्षकांना कणकवली सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक या नावाने पाठवण्यात आले आहे. ‘आम्ही मांडवली केली आहे…धाड पडणार नाही’ अशी हमी जुगारवाल्यांकडून खेळीना दिली जात असल्याची चर्चा आहे. या तक्रार अर्जाची प्रत कणकवली डीवायएसपी, एसपी तसेच गृहमंत्री आणि लोकप्रतिनिधींनासुद्धा पाठवण्यात आल्याचा उल्लेख आहे. कणकवली शहरात मुडे डोंगरी गारबेज डेपो, मलये मायनिंग नागवे रस्ता, मुडे डोंगरी पाणी प्लांट जवळ, गणपती साना आदी ठिकाणी अंदरबाहर जुगार सुरू असल्याचे पत्रात नमूद केले आहे. आता कणकवली पोलीस काय कारवाई करतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

error: Content is protected !!