कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना होऊ द्या चर्चा असे म्हणत 10 प्रश्न विचारणारा बॅनर कणकवली शहरासह तालुक्यात लावला.त्याला उत्तर म्हणून भाजपा कणकवली च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विकासकामांचा बॅनर पटवर्धन चौकात लावून उत्तर दिले आहे.आमदार नितेश राणेंनी 2200 कोटींची विकासकामे केली.आणलेल्या निधीची काम निहाय यादीच या बॅनर वर प्रसिद्ध केली आहेत.त्यामुळे भाजपाचा हा बॅनर जवाब लक्षवेधी ठरतो आहे.












