खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मारुती भिवा खांडेकर चा जामीन अर्ज फेटाळला ; चौके माळरानावर घडला होता गुन्हा

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सुऱ्याने , बांबू ने मारहाण करून दीपक वामन येंडे ( मूळ रा बोर्डवे , ता कणकवली ) याचा खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मारुती भिवा खांडेकर ( रा.कसाल मेस्त्रीवाडी, मूळ रा.जांभवडे भूतवड ता कुडाळ ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ.सानिका जोशी यानी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद करताना सांगितले की. मारुती खांडेकर , गणेश गावडे, अनाजी गावडे यांनी मयत दीपक yende याला सुऱ्याने आणि बांबू ने अमानुष मारहाण केली होती. वैद्यकीय उलचारदरम्यान दीपक चा मृत्यू झाला होता.ही घटना 8 एप्रिल 2023 रोजी रात्री 10 वा.42 मिनिटं ते 9 एप्रिल मध्यरात्री 1 वा.42 मिनिट दरम्यान घडली होती. या गुन्ह्यात फिर्यादी संतोष वामन yende यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गणेश गावडे, अनाजी गावडे ( दोघे, रा.चौके स्थळकरवाडी ) आणि मारुती खांडेकर विरोधात आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी संतोष yende यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौके येथील माळरानावर मयत दीपक yende याला वरील तिन्ही आरोपींनी मारहाण करताना प्रत्यक्ष पाहिले होते. जखमी दीपक yende याला फिर्यादीने आरोपींच्या तावडीतून सोडवून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात घटनास्थळवरून आणून वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस तपासात आरोपी मारुती खांडेकर आणि मयत दिपक yende याच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत दीपक yende याला मारहाणीत मारुती खांडेकर चा प्रत्यक्ष सहभाग होता. प्रत्यक्ष साक्षीदारांसमक्ष आरोपी मारुतीने मयत दीपक yende ला मारहाण केली आहे.आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो त्यांच्या जीवित अथवा मालमत्तेस हानी पोचवू शकतो.सरकारी वकील देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी आरोपी मारुती खांडेकर चा जामीन अर्ज फेटाळला.

error: Content is protected !!