गाडादेवी मंदिरात सुशांत नाईक यांच्याकडून सुशोभीकरण

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील गावराठीतील महत्वाचे गाडादेवी मंदिर हे शहरातील पुरातन मंदिर आहे. याची प्रचिती ही येथील नागरिकांनमध्ये आहे. या मंदिराची डागडुजी करायचा विचार सर्व भक्तगणांच्या मनात होता, याची जबाबदारी सुशांत नाईक यांनी उचलून मंदिराची लादी बसून देण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला. या गाडादेवी मंदिराचा परिसर नगरसेवक सुशांत नाईक यांच्या प्रभागात येतो. या ठिकाणी आज माजी नगरसेवक युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्वखर्चातुन लादी बसवून देण्याचे काम आज पासून सुरू करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांन मध्ये आनंद्दाचे वातावरण होते, गाडादेवी च्या भक्तगणांनी सुशांत नाईक यांचे आभार ही मानले.यावेळी गावपुरुष सदानंद राणे (बाळा), गावपुरुष मंगेश राणे,गावपुरुष अंबाजी राणे,ग्रामस्थ संजय घाडी, दिपक परब, दत्ता साटम.मुरलीधर नाईक,अनिल नाईक,सुशांत नाईक,आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!