एका महिन्यात तक्रारीचे निरसन करून बीएसएनएलचे नेटवर्क करणार “पावरफुल”

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी दिला विश्वास

बीएसएनएलच्या नेटवर्क प्रश्नसंदर्भात आमदार नितेश राणेंच्या अग्रवास्तव कणकवली प्रहार भवन येथे झाली बैठक

प्रमुख अधिकाऱ्यांसह गावचे सरपंच आणि पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती

प्रत्येक गावनिहाय घेतला नेटवर्क प्रश्नांचा आढावा

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि त्यामुळे मोबाईल टॉवरचे जाणारे नेटवर्क, नवीन टॉवर निर्मितीसाठी जमीनी सह प्रस्ताव देऊन सुद्धा टॉवर उभारणीसाठी होणारी दीरंगाई या संदर्भात गावो – गावच्या सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी कोल्हापूर येथील बीएसएनएलचे प्रधान महा प्रबंध यांच्यासमोर पाढा वाचला.कणकवलीत प्रहार भवन येथे भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.दरम्यान आमदार नितेश राणे यांनी जनतेच्या तक्रारींचे निरसन कसे करणार त्याचे वेळापत्रक ठरवा.प्रत्येक टॉवरचे नेटवर्क सुरळीत करा. ही सर्व कामे टाइम लिमिटमध्ये करा अशा सूचना केल्या. कोल्हापूर येथून आलेले प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी जेवढ्या तक्रारी आहेत त्यांचे निरसन एका महिन्यात केले जाईल. प्रत्येक महिन्याला त्या कामाचा आढावा घेतला जाईल असे आश्वासन दिले. टॉवरची रेंज का जाते आणि नवीन टॉवर उभारण्यासाठी कोणत्या गोष्टींची कमतरता राहिलेली आहे त्याचाही आढावा घेतला जाणार असे सांगितले. दरम्यान कणकवली, देवगड,वैभववाडी या तीन तालुक्यात नव्याने 157 बीएसएनएलचे टॉवर कोठेकोठे मंजूर झाले आहेत याची यादी यावेळी जाहीर करण्यात आली.

आमदार नितेश राणे यांना मतदार संघात गावभेटीदरम्यान बीएसएनएलच्या नेटवर्क संदर्भातील अनेक तक्रारी येतात. याबाबत मुंबई येथे दूरसंचार निगमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत चर्चा केल्यावर कोल्हापूर येथील महाप्रबंधकांच्या उपस्थितीत कणकवली येथे बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार आज मतदारसंघातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींची विशेष बैठक बोलावण्यात आलेली होती. कणकवली प्रहार भवन येथे ही बैठक झाली. या बैठकीला आमदार नितेश राणे यांच्यासह बीएसएनएलचे महाप्रबंधक अरविंद पाटील,भाजपचे उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,संतोष कानडे, नाशिक भाई काझी, अमोल तेली ,संतोष किंजवडेकर, मनोज रावराणे,युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बीएसएनएलचे सावंतवाडी उपमहाप्रबंधक आर.वी.जाणू, कणकवली येथील जुनियर ऑफिसर नेरकर, सब डिव्हिजन इंजिनियर देवगड चे कैलास पायमोडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!