खारेपाटण येथे १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी भव्य खुली ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

झुंजार मित्र मंडळ खारेपाटणचे नवरात्रोत्सव निमित्त आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण या मंडळाच्या वतीने यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त दी.१७ ऑक्टोंबर २०२३ रोजी भव्य खुल्या ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

खारेपाटण येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव निमित्त झुंजार मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या खुल्या ग्रुप रेकॉर्डडान्स स्पर्धेकरीता अंतिम विजेत्या संघाला रोख रुपये ७७७७/- व आकर्षक चषक देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला रोख रुपये ५५५५/- व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक विजेत्या संघाला रोख रुपये ३३३३/- व आकर्षक चषक तर उतेजनार्थ विजेत्या संघाला ११११/- रुपये व आकर्षक चषक देऊन सर्व विजेत्या संघाना मान्यवरांच्या उपस्थित गौरविण्यात येणार आहे.

या समूह नृत्य सोर्धेकरिता पुढील प्रमाणे अटी व नियम ठेवण्यात आले आहेत ते – १) ही समूह नृत्य स्पर्धा असून सामूहिक नृत्य स्पर्धा प्रकारातील कोणतेही नृत्य यामध्ये सादर करू शकतील.२) या समूह नृत्य स्पर्धेत कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १२ स्पर्धक सहभाग घेऊ शकतील.३) नृत्य सादरीकरण करण्याचा वेळ हा ४ ते ७ मिनिटांचा राहील. ४) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ५) स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार मंडळाकडे राहील. ६) स्पर्धक संघाने आपली ध्वनिफीत पेनड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये सेव्ह करून आणावी.

खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिर या ठिकाणी दी. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्री ठीक -१०.०० वाजता या स्पर्धेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार असून,झुंजार मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली ही समूह नृत्य स्पर्धा संपूर्ण विनाशुल्क अर्थात मोफत असून डान्स स्पर्धेसाठी कुठल्याही संघाकडून प्रवेश फी आकारली जाणार नाही. तरी ज्या स्पर्धकांना या ग्रुप डान्स स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे.त्यांनी आपली नावे दी.१६ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत झुंजार मित्र मंडळ खारेपाटण चे कार्यकर्ते दिगंबर राऊत – ८४२३८३३३४६ व महेश कोळसूलकर – ८३२९०८४०३० यांचेकडे नोंदवावीत.असे आवाहन झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये यांनी केले आहे.

error: Content is protected !!