नवरात्र उत्सव व‌‌‌ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने योग्य ती काळजी घ्या – जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आगामी येणाऱ्या नवरात्र उत्सव व‌‌‌ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस पाटील, नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांच्या बैठकीत बोलताना केले.

12 ऑक्टोबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक अग्रवाल सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत नवरात्र मंडळांची बैठक घेण्यात आली आहे. बैठकीला पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, काचारी हे उपस्थित होते. या बैठकी मध्ये उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनाचे तंतोतंत पालन करणे. महिलांबाबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेणे. ध्वनि प्रदूषण कायद्याचे पालन करणे. यावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, वाचक पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव, उपनिरीक्षक राजेंद्र दळवी, उपनिरीक्षक नितीन कदम तसेच नवरात्र मंडळांचे आयोजक, अध्यक्ष, कार्यकर्ते असंख्य जण उपस्थित होते.

error: Content is protected !!