कुडाळ (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नाबार्ड-२९ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण ३ पुलांसाठी ४ कोटी ५० लक्ष एवढा निधी मंजूर झाला असून त्यात ओरोस बुद्रुक सावंतवाडा(भवानी मंदिर जवळ) ग्रा.मा.८२ येथे पूल बांधणे १ कोटी ५० लक्ष, रानबांबुळी-ओरोस प्रजिमा 37 वरील किमी. 6/600 वर ब्रिज बांधणे- १ कोटी ५० लक्ष तर त्याच रस्त्यावर किमी. 4/300 वर नवीन ब्रिज बांधणे १ कोटी ५० लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे.
कुडाळ तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या कमी उंचीच्या पुलांमुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या स्थानिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता, या ठिकाणी नवीन ब्रिज मंजूर झाल्याने या रस्त्याने प्रवास करणे सुखकर होणार आहे. या कामांसाठी मागणी करणारे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल आणि महिला मोर्चा मंडल अध्यक्ष सुप्रिया वालावलंकर यांनी निलेश राणे यांचे या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त केले आहेत.












