चौके ( प्रतिनिधी ) : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडी येथील रहिवासी विनायक भगवान गोसावी ( वय – ८० ) यांचे गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुली, सुना, नातवंडे, भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. काळसे हायस्कूलचे लिपीक श्री. संजय गोसावी आणि असरोंडी हायस्कूलचे शिक्षक तथा साहित्यिक, कवी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष कमलेश गोसावी यांचे ते वडील होते.