वृध्द महिलेच्या घरात घुसत पाठीमागून येऊन गळ्यातील सोन्याची जोंधळी माळ घेवून चोर पसार

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील कसाल केळुसकरवाडी येथील जानकी रामचंद्र पवार या ८५ वर्षीय वृध्द महिलेच्या घरात घुसत अनोळखी व्यक्तीने ती बाथरूम मधून घरात येत असताना पाठीमागून येऊन गळ्याला पकडून सोन्याची पावणे दोन तोळ्याची जोंधळी माळ जबरीने खेचून घेवून पोबारा केला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ६.३० या वेळेत हा गुन्हा घडला आहे.

याबाबत स्वतः जानकी रामचंद्र पवार, वय 85 वर्षे, रा. कसाल केळूसकरवाडी यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गळ्यातील जोंधळी माळ जबरीने चोरून नेणारी अनोळखी व्यक्ती असून त्याने डोक्यापासून ते पायापर्यंत काळसर रंगाचे कपडे परिधान केलेले होते. तसेच तो अंगाने मजबूत व उंच होता, असे जानकी पवार यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. वृध्द जानकी या 12 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास कसाल केळुसकरवाडी येथील राहत्या घरातील सकाळी उठून बाथरूम मध्ये चेहऱ्यावर पाणी मारून मागील पडवीतून घरातील मागील दरवाजाने परत येत असताना एक अनोळखी व्यक्ती पाठीमागून येऊन गळ्याला पकडून जोंधळी माळ जबरीने खेचून पायी पळून गेला.

याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या करीत एक पावणे दोन तोळ्याची सोन्याची जोंधळीमाळ जुनी वापरती चोरीस गेली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी उपविभागीय अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या पथकासह सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी भेट दिली आहे. तसेच श्वान पथकाने सुद्धा भेट दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!