लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात एपीआय सागर खंडागळे यांना 3 दिवस पोलीस कोठडी

पीएसआय सूरज पाटील वर अटकेची टांगती तलवार

ओरोस (प्रतिनिधी) : 1 लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे एपीआय सागर खंडागळे यांना सोमवार पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डी. चव्हाण यांनी पोलीस कोठडी सुनावतानाच या गुन्ह्यातील अन्य आरोपी असलेले पीएसआय सूरज पाटील यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत असलेल्या पीएसआय सूरज पाटीलवर अटकेची टांगती तलवार आहे.

error: Content is protected !!