खारेपाटण – भुईबावडा एस टी गाडीच्या अनियमित उशिरा फेरीमुळे शालेय विद्यार्थ्यांना फटका

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने एस टी नियमित वेळेत हजर

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील हायस्कूल ज्युनियर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालयात शालेय शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याना खारेपाटण – भुईबावडा ही एस टी गाडी गेली ४ दिवस सलग अनियमित वेळेत येत असल्याने शालेय विद्यार्थ्याना याचा मोठा फटाका सहन करावा लगला.तर सलग दोन दिवस या भागात या मार्गावरील एस टी गाडी गेलीच नसल्याने समजते.त्यामुळे शालेय विद्यार्थी व प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करन्यात आली आहे.

खारेपाटण एस टी बस बसस्थानकातून खारेपाटण – भुईबावडा ही शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीकरीता दुपारी ठीक १२.४५ वाजता सोडण्यात येते.मात्र गेली चार दिवस सादर एस टी गाडी वेळेत न आल्याने विद्यार्थ्याना मोठा फटाका सहन करावा लागला.व पर्यायाने विद्यार्थ्याना खाजगी वाहनाने आपले घर गाठावे लागले.यामुळे विद्यार्थ्याना सवलतीचा पास असून देखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

आज अखेर खारेपाटण – भुईबावडा या मार्गावरील एस टी ने प्रवास करणाऱ्या ४० ते ४५ सर्व विद्यार्थ्यांनी स्थानिक एस टी कंट्रोलर एम एन चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारला.दरम्यान खारेपाटण गावचे सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेऊन स्थानिक आमदार नितेश राणे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधात अनियमित एस टी फेरीमुळे विद्यार्थ्यांचे होणाऱ्या नुकसाना बद्दल माहिती दिली.आमदार नितेश राणे यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ कणकवली एस टी विभाग नियंत्रक अभिजित पाटील वर्गाशी सम्पर्क साधून खारेपाटण – भूईबावडा एस टी गाडी वेळेत सोडण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान आज सर्व विद्यार्थी खारेपाटण – भुईबावडा ही एस टी गाडी खारेपाटण एस टी बसस्थानकात वेळेत आल्याने सर्व शालेय विद्यार्थी आनंदाने लवकरच आपआपल्या घरी जाणे पसंद केले.

error: Content is protected !!