कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील विकासकामे लागणार मार्गी
कणकवली विधानसभा मतदारसंघात भरघोस विकासनिधी चा ओघ सुरूच
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी मतदारांना दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांची शब्दपूर्ती करत 2515 हेडखाली तब्बल 5 कोटींचा विकासनिधी आणला आहे. कणकवली तालुक्यांसाठी1 कोटी 54 लाख, देवगड तालुक्यासाठी 2 कोटी 7 लाख, वैभववाडी तालुक्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर करून आणला आहे. याआधी मागील वर्षभरात तब्बल 2 हजार 200 कोटींहून अधिक विकासनिधी आणल्या नंतर आता पुन्हा 5 कोटींचा विकासनिधी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार नितेश राणे यांनी आणला आहे. या निधीतून नवीन ग्रामपंचायत इमारती, रस्ते डांबरीकरण, गणपती साना, कंपाउंड वॉल आदी विकासकामे मार्गी लागणार आहेत.महायुती सरकार सत्तेतवर येताच मागील वर्षभरात न भूतो असा विकासनिधी आमदार नितेश राणे यांनी आणला आहे.











