कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गालगत घाेणे दुकान नजीक तरंदळे रस्त्यावर काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळदार पावसात भलीमाेठी झाडाची फांदी तुटून रस्त्यावर आडवी पडली हाेती.काही काळ दाेन्ही बाजुंची वाहनांची रहदारी बंद हाेती.त्यानंतर ती फांदीचा काहीसा भाग ताेडून वाहतूक सुरु झाली. परंतु अर्धवट स्थितीत राहीलेला त्या फांदीचा भाग दुसर्या दिवशीही तसाच पडून राहिला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातास निमंत्रण मिळू शकते.खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने अर्थवट राहिलेली झाडाची फांदी हटवावी यावी अशी मागणी पादचारी, वाहनधारकांमधून व्यक्त हाेत आहे.
तरंदळे रस्यावर अर्धवट स्थितीत असलेली झाडाची फांदी दुसर्या दिवशीही तशीच पडून











