सरपंच सुशिल कदम यांचा पुढाकार
कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायतीच्यावतीने व सरपंच सुशिल कदम यांच्या संकल्पनेतून गावातील शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालय तरंदळे येथे आज विळी (कोयतीचे) वाटप करण्यात आले. एका रेशनकार्ड प्रमाणे एक विळी (कोयती) असे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सुशिल कदम यांनी मार्गदर्शन करताना गावातील नागरिकांना ग्रामसभेचे महत्व समजावून सांगितले. याही पुढे ग्रामसभेला उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या वर्षी ग्रामपंचायती मार्फत शेतकऱ्यांना भाता बियाणे चे वाटप देखील करण्यात आले हाेते.शेती पासून शेतकऱ्यांची उन्नती साधावी या साठी ग्रामपंचायत मार्फत नेहमी प्रयत्न केले जात आहेत.तसेच गावातील शेतकऱ्यांना राेजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील 230 लाभार्थी उपस्थित होते.यावेळी सरपंच सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,सदस्य.सुनीलदत्त जाधव, तेजस सावंत, दीपक घाडीगावकर, नेहा घाडीगावकर,संजना राणे, संजय परब, रेश्मा डोईफोडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत,माजी तंटामुक्ती अध्यक्ष जयसिंग नाईक,अभय सावंत,वनिता कदम, शामु गावकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.













