खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलिस विभाग एम.के.सी.एल महाराष्ट्र यांच्या वतीने ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे नुकतीच सायबर सिक्युरिटी व अमली पदार्थ जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी एका विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच अमली पदार्थांच्या दुष्परिणामां विषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला उपस्थित कणकवली पोलीस स्टेशनचे नलावडे साहेब, यांचे पवन कावळे यांचे शुभहस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारी देसाई साहेब व निकम साहेब यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच अमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर एम.के.सी.एल च्या वतीने यश कॉम्प्युटर अकॅडमी, खारेपाटणचे संचालक मंगेश गुरव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना मंगेश गुरव यांनी’ सुरक्षित सिंधुदुर्ग’ अभियानांतर्गत सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शेठ न.म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण चे प्राचार्य संजय सानप सर व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक वरुणकर सर, यशवंत रायबागकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे, तसेच अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे तसेच जबाबदार आणि सजग नागरिक बनण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले



खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे सायबर सिक्युरिटी व अमली पदार्थ जनजागृती अभियान कार्यशाळेस उपस्थित पोलिस अधिकारी श्री नलावडे बाजूला पवन कावळे, मंगेश गुरव, प्राचार्य संजय सानप इत्यादी मान्यवर..












