चौके (अमोल गोसावी) : ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल या आदर्श गाव योजने मधील प्रेरक अनुदानातून “ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालयासमोर सभामंडप बांधणे” या कामाचा शुभारंभ मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला . सदर काम हे आदर्श गाव योजने अंतर्गत पहिलेच मंजूर काम असून कामाची अंदाजपत्रकिय रक्कम ९,२५,३२५/- , श्रमदान रक्कम २,३१,६२५/- एवढी आहे.
या कार्यक्रमास पंचायत समिती मालवण गटविकास अधिकारी गुजर साहेब, तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी,आदर्श गाव संस्था अध्यक्ष मंगेश सावंत , कृषि पर्यवेक्षक सावंत, ग्रा. पं. सरपंच सुभाष लाड, ग्रा. पं. सदस्य शरद मांजरेकर, प्राजक्ता चिरमुले,मेघा गावडे, एकादशी गावडे, ग्रामसेवक अर्पिता शेलटकर , गाव गोळवण, कुमामे, डिकवल येथील ग्रामस्थ नंदादीप नाईक, नारायण परब,प्रल्हाद नाईक, विठ्ठल तळवडेकर,प्रकाश चिरमुले,बाबुराव चिरमुले,कुसाजी तेजम, सुहास घाडी, सत्यवान चव्हाण, मिलिंद पवार, प्रज्ञा चव्हाण, दाजी पाताडे,संजय पाताडे, जनार्दन गावडे,गजानन गावडे, श्रीकृष्ण तेली,नामदेव कुमामेकर, तसेच गावातील शाळेचे मुख्याध्यापक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, कामाचे मक्तेदार विजय पालव, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.











