देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी येथे भला मोठा वृक्ष कोसळला

दोन्ही बाजूने वाहतूक झाली ठप्प;वाहनचालकांची गैरसोय

कणकवली (प्रतिनिधी): देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी येथे आज सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे भला मोठा वृक्ष कोसळला आहे. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. अजून ही वाहतूक सुरळीत न झाल्याने वाहन चालकांची गैरसोय झाली आहे. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने जुनाट वृक्ष कोसळण्यापूर्वी उपययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ ,वाहनचालकांनी केली आहे.

error: Content is protected !!