जेष्ठ वकील राजेंद्र रावराणेंचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी): फ्लॅट विक्री प्रकरणात बिल्डर सिद्धांत परब याला सहकार्य करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात आरोपी एपीआय सागर खंडागळे याची 50 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. खंडागळे यांच्या वतीने जेष्ठ वकील राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला. 11 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात एसीबी ने धाड टाकून खंडागळे याना लाच स्वीकारताना पकडले होते.त्यांनंतर एकूण 4 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर खंडागळे न्यायालयीन कोठडीत होते. जामीनावर मुक्तता होण्यासाठी जेष्ठ वकील रावराणे यांच्या मार्फत खंडागळे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता.त्यावर झालेल्या सुनावणीननंतर जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी 50 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.दर सोमवारी सकाळी 11 वाजता एसीबी कुडाळ कार्यालयात हजेरी लावणे आणि तपासकामात सहकार्य करण्याची अट घालण्यात आली आहे.











