धामापूर येथे नविन मतदार नोंदणी संपन्न

चौके ( प्रतिनिधी) : ग्रामपंचायत धामापूर येथे आज शुक्रवार दिनांक २७ रोजी निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मतदार नोंदणी शिबीर संपन्न झाले. यावेळी मंडळ अधिकारी दिपक शिंग्रे , धामापूर सरपंच मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर , सदस्य प्रशांत गावडे , ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर, उल्हास थवी , प्रसाद चव्हाण, गणेश फोपळे, सुशीलकुमार घाडी , सिद्धी परब आदी जण उपस्थित होते. यावेळी मतदार यादीची छाननी करून मयत असलेल्या ७५ मतदारांची नावे कमी करण्यात आली आणि १८ वर्षे पूर्ण झालेल्या ३० नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली.

error: Content is protected !!