कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन जयंतीनिमित्त 4 नोव्हेंबर रोजी गोपुरीत कार्यक्रम

गोपुरी आश्रम वागदे आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन यांची 129 वी जयंती गोपुरी आश्रम वागदे आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग च्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रम गणपतराव सावंत सभागृह, नाईक पेट्रोल पंप मागे वागदे येथे शनिवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 :30 ते दुपारी 1:30 वा. दरम्यान साजरी करण्यात येणार आहे. भविष्यकालीन पिढीकरिता अपासाहेब पटवर्धन यांच्या कार्याची गरज या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.व्यसनमुक्ती कार्यातील सहभागी मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन गोपुरी आश्रम वागदे व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!