महाराष्ट्र एसएससी दहावीचा निकाल उद्या ; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल गुरुवार, ८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

यापूर्वी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना आपला निकाल mahahsscboard.in तसेच sscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

यंदाची दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातील ५१११ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, ७ लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी आणि १३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ३८७९ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

error: Content is protected !!