कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली च्या मनमानी कारभारा विरोधात उपोषण सुरू

स्नेहल तांबे यांचा निवडणूक अर्ज बेकायदेशीर फेटाळल्याच्या विरोधात छेडले उपोषण

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई च्या कणकवली शाखेच्या पदाधिकारी निवडीत भिरवंडे विभागाने बिनविरोध निवडलेल्या महिला सदस्य स्नेहा सुनील तांबे यांचा अर्ज फेटाळण्यात आला. कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी कारभाराने कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई च्या सभेत स्नेहल तांबे यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याच्या विरोधात शिवडाव बौद्ध विकास संघ मुंबई शाखा शिवडाव च्या पदाधिकाऱ्यांनी रविवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळपासून कणकवली तालुका बौद्ध विहार समोर उपोषण छेडले आहे. कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली च्या सदस्य निवडीबाबत मुख्य संघटनेकडून मार्गदर्शक तत्वे आणि सूचना जाहीर केल्या गेल्या. त्यानुसार शाखेच्या भिरवंडे विभागांतर्गत संदीप सोमा तांबे, संदीप रामचंद्र तांबे आणि स्नेहल सुनील तांबे या 3 सदस्यांची बिनविरोध निवड 22 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.या तिन्ही सदस्यांचे अर्ज विभागीय अध्यक्ष, सरचिटणीस यांच्या शिफारशीने निवडणूक प्रक्रिया अधिकारी सुनील काशीराम तांबे यांच्याकडे देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया अधिकारी तांबे यांनीही या तिन्ही सदस्य अर्जाला कोणतीही हरकत घेतली नाही.मात्र कणकवली तालुका बौद्ध विकास शाखा मुंबई यांच्या 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत महिला सदस्यपदासाठी स्नेहल सुनील तांबे यांचा दाखल केलेला अर्ज कोणतीही सबब न सांगता रद्दबातल ठरवला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई संघाचा असल्याचे यातून दिसत असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!