खारेपाटण बुद्धविहारात विशेष धम्म वर्गाचे आयोजन

सम्राट अशोकाच्या धम्म क्रांतीचे विचार तळागाळात पोहचवा – प्रकाश सकपाळ

खारेपाटण (प्रतिनिधी): भारताच्या राष्ट्रध्वज तिरांगग्यावरील अशोक चक्राचा महानायक चक्रवर्ती बौद्ध राजा सम्राट अशोक यांचे धम्म क्रांतीचे विचार तळागाळातील लोकामध्ये पोहचवा.”असे भावपूर्ण उदगार फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व साहित्यिक प्रकाश सकपाळ(कोंड्ये),राजापूर यांनी खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहार आयोजित करण्यात आलेल्या विशेष धम्म वर्गात मार्गदर्शन करताना काढले.
पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहार विशेष धम्म वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्षा आकांशा पाटणकर, राजापूर तालुका बौद्धजन सेवा संघाचे बौद्धाचार्य महेंद्र पवार, खारेपाटण बौद्धजन सेवा संघाचे बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर,पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे कोषाध्यक्ष संदीप पाटणकर आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात दर शनिवारी आठवड्यातून एकदा धम्मवर्ग चालतो.यामध्ये लहान मुालाबरोबरच सर्वच नागरिकांना धम्मा विषयी माहिती दिली जाते.हा उपक्रम गेली १५ वर्षे पेक्षा अधिक काळ येथील स्थानिक मंडळाने चालू ठेवला असून शनिवारी दी.४ नोव्हेंबर २०२३ रोजी विशेष धम्म वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी धम्मवर्गतील मुलांनी कु.सांची संतोष पाटणकर व कु.दीक्षा दिनेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक धम्मपूजा पाठ घेतला.या कार्यक्रमाला धम्मप्रवचान देण्यासाठी उपस्थित असलेले धम प्रचारक प्रकाश सकपाळ यांचे स्थानिक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!