खारेपाटण (प्रतिनिधी) : गावच्या रहिवासी असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या व पक्षाच्या महिला कार्यकर्त्या नंदिनी समीर पराडकर यांची नुकतीच शिवसेना पक्षच्या सिंधुदुर्ग जिल्हा महीला आघाडी उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाली असून त्यांच्या त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,अशोक दळवी,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, महीला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,तसेच जिल्हातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नंदिनी पराडकर (खारेपाटण) व सरिता राऊत(देवगड) या दोन महिलांची कणकवली,देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघ शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
नंदिनी पराडकर यांनी काही महीन्यापूर्विच उबाठा शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करीत मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला होता. याची पक्ष वरिष्ठ नेत्याकडून दखल घेत नुकतीच त्यांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी उप जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली असून शिवसेना पक्षाच्या सावंतवाडी येथे पार पडलेल्या सोशल मीडिया राज्यव्यापी कार्यशाळेत शिवसेनापक्षाच्या वतीने निवडीचे लेखी पत्र देऊन जिल्हा प्रमुख संजय आंग्रे व जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख नंदिनी पराडकर यांनी शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर, कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांचे आभार मानले व या सर्वांना विश्वासात घेऊन आपण पक्षसाठी काम करणार असल्याचे सांगितले.
” शिवसेना पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. ती आपण प्रामाणिकपणे पार पाडणार असून येत्या काळात महिलांचे संघटन करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नंदिनी पराडकर यांनी सांगितले.












