चौके बाजारपेठ नजीक एसटी बस – डंपर यांच्यात अपघात.

चालक वाहकासह प्रवासी किरकोळ जखमी एसटी च्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान.

चौके (अमोल गोसावी) : मालवणवरून कसालच्या दिशेने जाणारी मालवण कणकवली एसटी बस आणि येथीलच डंपर मागे घेताना डंपरच्या मागील हौद्याला एसटीची ड्रायव्हर साईडने धडक बसल्याने चौके बाजार पेठे नजीक अपघात घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मालवण आगारातून दुपारी बारा वाजता सुटलेली मालवण कणकवली एसटी बस (MH14- BT -2415) ही चौके बस स्टॉप येथील प्रवासी घेऊन काही अंतरावर गेली असता येथील एक डंपर चालक नेहमीप्रमाणे डंपर (MH07-F 5301) हा मागे घेत असताना एसटीची बस चालकाच्या बाजूने डंपर ला मागून जोरदार धडक बसली. यात चालक थोडक्यात बचावला. मात्र धडक एवढी जोरदार होती कि बसमधील वाहक आणि पुढे बसलेले प्रवासी यांना किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थानी धाव घेत जखमीना ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी काही वेळ वाहतूक खोलंबली होती. वाहकाने उपघाताची खबर मालवण आगारात दिली. एसटी प्रशासनाकडून अपघात स्थळाच्या ठिकाणी माहिती घेत पंचनामा करण्यात आला. या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!