७ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धेत

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र मनीष भालेकर यांचे नेत्रदीपक यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ७ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धेत धावपटू व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली या गावचे सुपुत्र श्री मनिष भालेकर यांनी नेत्रदीपक यश संपादन करत चिंचवलीसह खारेपाटण व अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नावलौकिक उंचावला आहे. या स्पर्धेत मनिष भालेकर यांनी ४ रौप्य व १ कांस्य , पदकाची कमाई केली असून, त्यांचा आगामी होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो खेळाडू सहभागी झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत मनिष भालेकर यांनी आपला दबदबा कायम राखला. ५०+ (पन्नास वर्षांवरील) वयोगटात झालेल्या लांब उडी स्पर्धेत १६ फुट ४ इंच झेप घेत द्वीतीय क्रमांक पटकावत रौप्य पदक जिंकले. तसेच, तिहेरी लांब उडी मध्ये २९ फुट ४ इंच झेप घेत तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक जिंकले. ५००० मीटर खडतर चालण्याच्या स्पर्धेत मनिष भालेकर यांनी उत्कृष्ट वेळेची नोंद करत द्वितीय क्रमांक पटकावला आणि रौप्य पदकाचे मानकरी ठरले. तसेच ४ x १०० मीटर महिला व पुरुष मिक्स रिले स्पर्धेमध्ये हि त्यांनी दमखम दाखवत १ मिनिट १५ सेकंदाची वेळ देत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकाचे मानकरी ठरले. सोबतच ४ x १०० मीटर पुरुष रिले स्पर्धेमध्ये हि १.०२ मिनिटाची वेळ देत रौप्य पदकावर आपला शिक्का मोरतब केला.

नागपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
राज्यस्तरीय स्पर्धेतील या दमदार कामगिरीच्या जोरावर मनिष भालेकर हे आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. येत्या ८ ते १० जानेवारी २०२७ दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून,राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!