कुडाळात फटाके फोडून भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

कुडाळ (प्रतिनिधी) : छतीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या तीन राज्यात भाजपाची एक हाती सत्ता आल्यानंतर रविवारी कुडाळ येथे भाजपा पदाधिकारी – कार्यकत्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करीत जल्लोष केला. छतीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा या. राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मत्मोजणी आज करण्यात आली. मतमोजणी टप्या टप्याने जाहीर होताच छतीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या तीन राज्यात भाजपने आघाडी घेतली आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अखेर या तीन राज्यात भाजपने मुसंडी मारीत बहुमत मिळविल्यानंतर कुडाळ येथील भाजप कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकत्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच वंदे मातरम् भारत माता की जय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता केसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. भाजप महाराष्ट्र निमंत्रित सदस्य बंड्या सावंत, कुडाळ तालुका चिटणीस राजेश पडते, कुडाळ नगरसेवक नीलेश परब व गणेश भोगटे, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, राजू बक्षी, अनिल कुडपकर, अवधूत सामंत, तन्मय वालवलकर, सतीश माड्ये रेवती राणे, लवू कदम आरिफ मुजावर आदी उपस्थित होते. फोटो कुडाळ – तीन राज्यातील भाजपच्या विजयानंतर आनंद व्यक्त करताना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते,

error: Content is protected !!