शिवसेना नेते,खासदार विनायक राऊत राहणार उपस्थित
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथे शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रम प्रसंगी उंबर्डे गावातील अनेक भाजपा कार्यकर्ते अंतर्गत गटबाजी ला कंटाळून खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उ.बा.ठा सेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.आज उंबर्डे येथे नियोजीत ठिकाणी जाऊन शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी तयारीचा आढावा घेतला व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देखील दिल्या.
यावेळी संदीप सरवणकर,स्वप्नील धुरी,जावेद पाटणकर,बावधकर,पांडुरंग पांचाळ,अबू मेस्त्री,धनंजय हेरलेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.













