बांदा नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर मंडळाच्या अध्यक्षपदी आप्पा चिंदरकर

बांदा नवरात्र उत्सव मंडळ कार्यकारिणी जाहिर

बांदा (प्रतिनिधी) : येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर मंडळाच्या अध्यक्षपदी आप्पा चिंदरकर यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुभाष शिरोडकर, सचिवपदी पुरुषोत्तम पेडणेकर, खजिनदारपदी सलील वळंजू, तर सहसचिवपदी बाळा आकेरकर यांची निवड झाली.

आगामी नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. भाविक व स्थानिक नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेत यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला. या बैठकीस मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!