दुष्काळाच्या फोंडाघाट पंचक्रोशीत झळा ! भात शेती करपली.कृषी विभाग सुशेगात ! शेतकरी वैफल्यग्रस्त !

फोंडाघाट पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या बांधावर, पालकमंत्री,जिल्हाधिकारी, कृषी विभाग कधी दिसणार ? शेतकऱ्यांचा आर्जव !

तातडीने शासकीय मदत, कर्जमाफी, व्याजमाफी, देऊन शेतकऱ्यांना जीवदान द्यावे — मागणी.

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शेतीसाठी पोषक पाऊस न झाल्यामुळे फोंडाघाट पंचक्रोशीतील भात शेती उन्हामुळे पिवळी पडली असून वर्कस जमिनीला पाण्याअभावी तडे गेले आहेत.तर वरून उन्हाच्या झळा मुळे पोसवलेल्या लोंबी मध्ये दाणा तयार न होता,केसर दाणे काळे पडले आहे. गेले तीन वर्षे निसर्गाच्या लहरीपणामुळे मशागत, लावणी, पेरणी, बियाणे, आणि खते, मजुरी ,औषधांसाठी खर्च करताना राबलेले सर्व कष्ट वाया गेले आहेत. त्यामुळे शेती पूर्णतः वाया गेली आहे.काही भागात भात- फुलोऱ्यावर दव आणि पावसामुळे लोंबीमध्ये दाणे तयार झाले नाहीत. त्यामुळे पीक धोक्यात असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आणि शासकीय मदतीवर अवलंबून आहे.

त्यातच कृषी विभागाच्या संपामुळे शेतकऱ्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप आहे. मोठमोठ्या योजना, इशारे, कृतीसंदेश, घोषणा ,पंचनामे, केवायसी, देखाव्यामध्ये अडकलेले प्रशासन, फोंडाघाट मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कृषी विभाग कधी दिसणार ?असा वैफल्यग्रस्त संताप शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. कणकवली पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वेदना कधी समजून ? प्रशासन मदत करणार,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

error: Content is protected !!