वैभववाडीत महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास मी असमर्थ असल्याचा विद्यार्थ्याचा चिठ्ठीद्वारे संदेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आज वैभववाडी शहरात राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश अनिल गावडे रा. फलटण, जि. सातारा असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. मी माझ्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे. असा संदेश त्याने चिठ्ठीद्वारे लिहून ठेवला होता. तो राहत असलेल्या खोलीत पोलिसांना ती चिठ्ठी सापडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील व प्रवीण देसाई, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस अभिजित मोरे, सुरज पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले होते. तरुणाचा मृतदेह पोलीसानी शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. सदर घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!