सिंधुदुर्ग मित्रमंडळ चिपळूण व लोकमान्य टिळक वाचन मंदिर चिपळूण च्यावतीने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यटन लोक कला महोत्सव च्या समारोप वेळी अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. व्यवसाय व नोकरी निमित्त सिंधुदुर्गतील काही नागरिक चिपळूण ला स्थायिक झाले आहेत.अभिनेत्री कांबळी यांनी प्रथमच महिला दशावतार चिपळूण महोत्सवाच्या निमित्ताने सादर केला .त्याला चिपळूण वाशियानी भरभरून साथ दिली.आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महिला कलाकार गेली दहा वर्षे दशावतार ही लोक कला मोठ्या हौसेने जोपासत आहे ही खूप मोठी कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे असे उदगार सिंधुदुर्ग मित्रमंडळ चे महादेव सामंत यांनी काढले,यावेळी बाबू राव रावले,महादेव सामंत, शशिकांत राणे यांनी सौ.कांबळी यांचा सिंधुदुर्ग मित्रमंडळाच्यावतीने सत्कार केला तसेच लोकमान्य टिळक स्मा.वाचन मंदिर व आपरांध संशोधनच्या संचालिका दिशा रावराणे यांनी भव्य रंगमंचावर सौ कांबळी यांचा शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार केला.यावेळी महिला दशावतार चे संगीत साथ देणारे सिद्धेश कुडव,श्याम तांबे, सागर मेस्त्री,दीप निर्गुण,सिधुरत्न चे अनुज कांबळी,रविकिरण शिरवलकर,विनोद मुणगेकर, कलाकार लक्षुमी गवस, साक्षी आंमडोस्कर,गौरी सावंत, शिवानी डीचोलकर,अनुष्का ठाकूर ,माणशी कांबळे तसेच चिपळूण पंचक्रोशीतील प्रेक्षक बहुसंख्येने उअस्थित होते एकाच दिवशी चार सत्कार होणाऱ्या अभिनेत्री अक्षता कांबळी यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!