कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या निवासस्थानी केला पक्षप्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते भारतीय चर्मकर समाज मुंबई- महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष हे गेली अनेक वर्षे सेवा बजावत असताना, सुद्धा सामाजिक कार्यात, कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग घेवुन काम करीत आहेत. जिल्हाध्यक्ष शिवसेना संदेश पारकर ह्याचें निकटवर्तीय मानले जातात. पारकर यांच्या सोबत सर्व क्षेत्रात त्यांनी हिरहिरीने भाग घेतला आहे. चव्हाण हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. समाजकार्य बरोबरच राजकारणात उतरले आहेत. शिवसेना पक्ष निवडण्याचे कारण म्हणजे 80 % समाजकारण 20 % राजकारण हे ध्येय मा. कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. व समाजकारण करता करता राजकारण करावे. या एकाच चव्हाण यांनी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत ,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा अध्यक्ष नीलम पालव, उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, रिमेश चव्हाण,सतीश सावंत यांच्या निवासस्थानी प्रवेश केला.
यावेळी मा. दुधवडकर म्हणाले, की चव्हाण यांचा पक्षात प्रवेश योग्य तो सन्मान केला जाईल. जिल्हापरिषद कामकाजाबाबत माहिती असलेला ऐक कार्यकर्ता आम्हाला मिळाला. जिल्हाध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, चव्हाण हे ऐक उमेद नेतृत्व आहे. त्यांचा अनेक सामाजिक क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. ते पक्ष काम सुद्धा निष्ठेने करतील असे मला वाटते, ते पक्षात आले त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. त्यांचे उ.बा.ठा.सेनेत पक्षात स्वागत आहे. इतर सर्व मान्यवरांनी श्री. चव्हाण यांचे करुन अभिनंदन शुभेच्छा दिल्या. पक्षाची जबाबदारी दिली.ती समर्पकपणे पार पाडेन ,पक्षाचे वरिष्ठ नेते यांना पक्षाच्या दृष्टीने जे काम अपेक्षित आहे.ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.













