अभिवाचन महोत्सव २०२४ चेआयोजन

प्राथमिक फेरी महाड येथे होणार

महाड (प्रतिनिधी): पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती रंगगंध संमिश्र जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव चाळीसगाव २०२४ रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव ही कलासंस्था २१ वर्षापासून पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव हा स्पर्धात्मक उपक्रम घेत असतो. यंदा या स्पर्धेचे एकविसावे वर्ष आहे. यामध्ये महाराष्ट्रात २० ठिकाणी प्राथमिक फेरी होणार आहे तर परराज्यातील आणि परदेशातील स्पर्धक संघांकरिता प्राथमिक फेरी म्हणून २५ ते ३० मिनिटांचा व्हिडीओ थेट रंगगंध कलासक्त न्यासकडे पाठवून सहभाग घेता येणार आहे. अशातऱ्हेची संमिश्र अभिवाचन स्पर्धा होणार आहे.

महाराष्ट्रातील स्पर्धक संघांकरता प्राथमिक फेरी मुंबई, कल्याण, महाड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मिरज / सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, लातूर, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर, या ठिकाणी डिसेंबर व जानेवारी महिन्यात होणार आहे. या स्पर्धेमध्ये एका संघातुन दोन ते पाच कलाकारांना २५ ते ३० मिनिटांचे साहित्य अभिवाचन करता येईल. या मध्ये गूढकथा/रहस्यकथा किँवा चरीत्रकथन अशा साहित्य कृतीचे विषयाला धरून नाट्यात्मक अनुभूती देणारे अभिवाचन सादर करायचे आहे. मात्र नाटक किंवा एकांकिका सादर करता येणार नाही. प्राथमिक फेरीत आलेल्या स्पर्धक संघ संख्येनुसार अंतिम फेरीत एक किंवा दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतात.

अंतिम फेरी 23,24,25 फेब्रुवारी2024 रोजी चाळीसगाव येथे होईल अंतिम फेरीत आलेल्या स्पर्धा स्पर्धक संघांना प्रवास खर्च सहाय्य, राहण्या,जेवण्याची सोय रंगगंधतर्फे केली जाईल. या स्पर्धेमध्ये सुमारे ५०,००० रुपयांची पारितोषिके देण्यात येतील.

परदेशातील आणि परराज्यातील स्पर्धक संघांना व्हिडीओद्वारे अभिवाचन सादर करता येईल. नवीन लेखकांसाठी खास संधी – या स्पर्धेसाठी नव्याने लिहिलेल्या संहिता अंतिम फेरी कमीत कमी तीन आल्यास सर्वोत्कृष्ट संहिता लेखनाचे पारितोषिक म्हणून रुपये १०००, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह त्या लेखकाला देण्यात येईल.नवीन लिहिलेल्या संहितेना विषय बंधन नसेल (राजकीय,अश्लील, वादग्रस्त नसाव्यात)

जागतिक पातळीवरील अभिवाचन स्पर्धेच्या एकूण 20 केंद्रांवर होणाऱ्या प्राथमिक फेऱ्यापैकी,रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होणारी प्राथमिक फेरी दि. २८ जानेवारी २०२४ महाड येथे, सकाळी 9 ते साय 6 पर्यंत होणार आहेत, प्राथमिक फेरीत सहभागी सर्व संघाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, व प्रथम क्रमांक सर्वोत्कृष्ट संघ अंतिम फेरीत पाठवण्यात येईल, त्या सोबत सर्वोत्कृष्ट द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ संघाना पारीतोषिक देण्यात येईल, वैयक्तिक वाचिक अभिनयाची पाच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल,प्राथमिक फेरी करीता किमान आठ संघ येणे अपेक्षित आहे, नियोजनात बदल करण्याचा अधिकार स्थानिक केंद्र प्रमुखना राखीव ठेवण्यात आला आहे,

( अधिकमाहिती व पत्रकासाठी- राकेश मेहता,आपली वाणी-महाड९८८१४७९२१४) कलाप्रेमी मंडळींना आपल्याला विविध तऱ्हेने या उपक्रमामध्ये सहभागी होता येईल. कृपया रंगगंध कार्यालय, चाळीसगांव) ९६६५६२६०९२
या क्रमांकावर संपर्क करा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या.

error: Content is protected !!