वैभववाडीत १६ डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून शनिवार दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना युवासेना, महिला आघाडी यांच्या सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सदर शिबीर प्रसंगी वेळेत उपस्थित राहावे व शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा होईल यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान युवा सेनेचे जिल्हा चिटणीस – स्वप्निल धुरी यांनी केलं आहे.

error: Content is protected !!