सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग आणि पोक्सो च्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी साईप्रसाद पांडुरंग कामतेकर, ( वय 30, रा. कवठणी सावंतवाडी ) याला विशेष तथा जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी तपास केला. आरोपी साईप्रसाद कामतेकर हा विवाहित असून त्याने अल्पवयीन मुलीला एका मोबाईलवरून आणि hotboy या इन्स्टाग्राम अकाउंट वरून धमकावून पीडित मुलीचे विवस्त्र फोटो आणि व्हीडिओ व्हाटसप आणि इन्स्टाग्राम सोशल मीडियावर पाठवण्यास भाग पाडले.त्यानंतर तव फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. ही घटना ऑगस्ट 2022 ते 12 नोव्हेंबर 2023 दरम्यान घडली आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी साईप्रसाद याला कुडाळ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी अटक केली होती.आरोपी साईप्रसाद याला आज विशेष जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता सरकारी वकील देसाई यांनी 3 दिवस गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस कोठडीसाठी युक्तिवाद केला. त्यांनंतर विशेष जिल्हा तथा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री भारुका यांनी आरोपी साईप्रसाद याला 16 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.












