आचरा (प्रतिनिधी) : यशराज प्रेरणा संघटना आचरा आणि आचरा कॉलेज NSS ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नागझरी देवतीर्थ आचरा येथे देव दिवाळीचे औचित्य साधत आज श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात मंदिरापर्यंतची वाट झाडणे,पालापाचोळा गोळा करणे,प्लास्टिक कचरा,साबणाच्या कव्हर, कागदांचा कचरा,खराब कपडे, प्लास्टिक बॉटल,अनावश्यक झाडी साफ करणे,पाण्यात पडलेला पालापाचोळा काढणे इत्यादी कामे करण्यात आली.
यावेळी NSS आचरा काँलेजचे 55 विद्यार्थी,संघटना अध्यक्ष मंदार सरजोशी,उपाध्यक्ष गणेश आचरेकर,कार्यवाह प्रियांका हिंदळेकर,खजिनदार स्वप्निल गोसावी, कार्यवाह-मिनल साटम,सदस्य पंकज घारे,शिक्षक – कांबळी,मुणगेकर,सारंग उपस्थित होते.












