नितेश राणेंचा ठाकरे सेनेला पुन्हा दणका! ठाकरे सेनेचे ओंबळ सरपंच उपसरपंच भाजपात दाखल

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला पुन्हा एक दणका दिला असून देवगड तालुक्यातील ओंबळ गावचे नूतन सरपंच अरुण पवार, उपसरपंच प्रवीण पवार यांनी आज आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणेंच्या माध्यमातूनच ओंबळ गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो हे जाणून घेत आ. नितेश राणेंच्या विकास प्रक्रियेवर विश्वास ठेवत ओंबळ गावात सत्तापरिवर्तन झाले आहे.

यावेळी शरद पवार, सहदेव पवार, जितेंद्र पवार, चंद्रकांत पवार, महेश उबळकर, चंद्रकांत गावडे, नरेंद्र पवार, राजेंद्र पवार, अजित पवार, प्रशांत पवार व उपस्थित भाजप पदाधिकारी श्री. संदीप साटम, डॉ. अमोल तेली,श्री. संतोष किंजवडेकर, श्री. बंड्या नारकर, श्री. अमित साटम, श्री. राजेंद्र शेट्टे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!